Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच

“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का
आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत –  उद्योगमंत्री उदय सामंत 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील सहा जण अपघातात दगावले होते तर आज दोन ट्रक मध्ये अपघात होऊन एक जण दगावला आहे. समोर चालणाऱ्या ट्रकवर पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्यामुळे पाठीमागील ट्रक मधील चालक हा जागेवरच ठार झाला असल्याची प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी माहिती दिली आहे. या ट्रकमध्ये कांदे भरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाने धडक दिली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, वाहन चालकाला त्यांच्या साहाय्याने काढून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

COMMENTS