Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलद गाडयांना पुणतांबा स्थानकावर थांबा मिळावा

सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली मागणी

पुणतांबा प्रतिनिधी - पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ खासदार सदाशिव लोखंडे यांना नवी दिल्लीत भ

जरे हत्याकांड प्रकरण वर्ग करण्यावर 16 डिसेंबरला सुनावणी
गटविकास अधिकार्‍यामुळे आरओ प्लॉन्ट सुरू
मविआने अकोले विधानसभा मतदारसंघ माकपला सोडावा

पुणतांबा प्रतिनिधी – पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ खासदार सदाशिव लोखंडे यांना नवी दिल्लीत भेटले. खासदार लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पत्र देऊन लवकरच पुणतांबा रेल्वे स्थानकावर तीन गाड्यांना थांबा मिळेल असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.
कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे खासदार लोखंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवासी वर्गांचे हाल होत आहे. पुणतांबा रेल्वे स्थानकाला जंक्शनच्या दर्जा असला तरी स्थानकावर जलद गाड्या थांबत नाही स्थानकावर अपुर्‍या सुविधा याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. त्यात कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस झेलम एक्सप्रेस पुणे नागपूर पुणे लखनऊ तसेच नव्याने सुरू झालेल्या नगर आष्टी डेमो पुणतांबा पर्यंत येऊन शिर्डी पर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी शिष्टमंडळात विजय धनवटे बाजीराव धनवटे मनसेचे शहराध्यक्ष संदीप लाळे बापूराव धनवटे रामदास काळे कारभारी बत्तासे वसंत चव्हाण यांचा समावेश होता.

COMMENTS