Homeताज्या बातम्यादेश

शेतकरी राजधानीत रेल्वे, बसमधुन घुसणार

नवी दिल्ली ः किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच इतर म

वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान
पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग 
म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली ः किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच इतर मागण्यांसाठी शेतकरी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. मात्र शेतकर्‍यांनी आता पुढील दिशा ठरवली असून, शेतकरी राजधानीमध्ये रेल्वे आणि बसमधून दाखल होणार आहेत. शेतकरी 10 मार्च रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन करणार आहेत. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले, पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवरून शेतकर्‍यांना पुढे सरकू दिले जात नाही. त्यामुळे 6 मार्च रोजी देशातील इतर राज्यांमधील शेतकरी बस आणि रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर सरकारविरोधात आंदोलन करतील. परंतु, पंजाबचे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरच आंदोलन करतील. शंभू आणि खनौरी सीमेवरील आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी आंदोलक शेतकर्‍यांची संख्या अधिक वाढवली जाणार आहे.

COMMENTS