Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बियाणे, खाते खरेदी करताना शेतक-यांनी दक्षता घ्यावी

लातूर प्रतिनिधी - आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करतांना शेतक-यांनी दक्षता घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार

शेतकर्‍यांच्या उत्पादनाचा आर्थिक फायदा व्यापार्‍यांनाच
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
राजूर पोलिस स्टेशन वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक

लातूर प्रतिनिधी – आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करतांना शेतक-यांनी दक्षता घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे तसेच गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे, असे कृषी विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. बनावट भेसळयुक्त बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडेसे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे सीलबंद अथवा मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील वापराची अंतिम मुदत तपासून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्यास अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचा-यांशी संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. आपल्या तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल, एसएमएसद्वारे देऊन शासनाच्या गतिमान गुण नियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या 1800 233 4000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दिवेगावकर यांनी केले आहे.

COMMENTS