Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध दरवाढीसाठी कर्जत तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

मंत्री विखे पाटील यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित

कर्जत :  सरकारने दुधाचे दर वाढवावेत या मागणीसाठी सोमवारी कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी उपोषण केले. द

बाळ हिरड्यास रास्त भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार
महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे फरार
साखळी उपोषणास त्रिदल माजी सौनिक सेवा संघाचा पाठिंबा

कर्जत :  सरकारने दुधाचे दर वाढवावेत या मागणीसाठी सोमवारी कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी उपोषण केले. दुधाची दर वाढ होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला. मात्र दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्याचे, आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी अशोक खेडकर म्हणाले, गारपीट, दुष्काळ या समस्यांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यातच असताना शेतीपुरक मुख्य व्यवसाय असलेला दूध धंदा हा दुधाला चांगले भाव मिळत नसल्यामुळे अडचणीत सापडलेला आहे. लाखो रुपये किमतीची जनावरे शेतकर्‍यांच्या दावणीला आहेत. मात्र दुधाला भाव नसल्यामुळे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने त्यांचा सांभाळ करणे शेतकर्‍यांना अडचणीचे होत आहे. सध्या चार्‍याचा प्रश्‍नही गंभीर आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकर्‍यांना सोबत घेवून हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावेळी बाळासाहेब सपकाळ, शेखर खरमरे, रावसाहेब खराडे, नारायण जगताप, सुनील शेलार, रघुनाथ काळदाते, काकासाहेब धांडे, उदयसिंह परदेशी, अंबर भोसले, संजय तोरडमल यांच्यासह अनेक दूध उत्पादक शेतकर्‍यांची भाषणे झाली. यावेळी संजय तोरडमल, बापूसाहेब नेटके, काकासाहेब तापकीर, मंगेश जगताप, शरद यादव, लालासाहेब सुद्रिक, अशोक जगताप, दादा खराडे, दादासाहेब सोनमाळी, राजू वारे, बाळासाहेब निंबाळकर, संदीप शेगडे, हितेंद्र तोरडमल, हितेंद्र तोरडमल, सचिन सोनमाळी, महेंद्र निंभोरे, बबन जगताप, शहाजी भोसले, जयसिंग पाटील, बापूसाहेब शेळके, सज्जन पठाण, महेंद्र निंभोरे यांच्यासह अनेक शेतकरी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

COMMENTS