काबूल विमातळाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला

Homeताज्या बातम्यादेश

काबूल विमातळाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला

काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून येथील हल्ल्यात वाढ झाली असून, सोमवारी पुन्हा एकदा रॉकेट हल्ला झाला आहे. सलीम कारवान परिसरात सो

इस्त्रोची गगनभरारी
राज्यात यंदाचा उन्हाळा कडक
सत्ता संघर्षात व्हीपचा मुद्दा

काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून येथील हल्ल्यात वाढ झाली असून, सोमवारी पुन्हा एकदा रॉकेट हल्ला झाला आहे. सलीम कारवान परिसरात सोमवारी सकाळी रॉकेट हल्ला झाला. स्फोटानंतर लगेच गोळीबार देखील झाला आहे. पण हा हल्ला आणि गोळीबार कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानमध्ये आपले बचाव कार्य सुरू ठेवणार आहे. त्यापूर्वी एक दिवस आधीच राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील शेजारी रॉकेट हल्ला झाल्याने अमेरिका काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रविवारी दुपारी देखील काबूल विमानतळाच्या वायव्य भागात रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात तीन मुले मारली गेल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानातून 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी घेण्याच्या घोषणेनुसार अमेरिकेने आता त्याचा अखेरचा टप्पा सुरू केला आहे, तर दुसर्‍या बाजूला सत्तास्थापनेसाठी तालिबानी नेत्यांच्या हालचालींनीही वेग घेतला आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात 169 अफगाण नागरिक आणि 13 अमेरिकी सैनिकांचा बळी गेला होता. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आयसिसला हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला होता.

COMMENTS