Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंडलधिकार्‍यावर कारवाईसाठी शेतकर्‍यांचे उपोषण

तहसीलदारांचा आदेश असतांनाही रस्ता खुला नाही

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील गट नंबर 245/1 या क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी असणार्‍या वहीवाटीच्या रस्त्यावरील गट नंबर 217/1 मधील

५G मोबाईल टॉवरमुळे कर्करोगाचा धोका… टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध…
मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी चमत्कार केला- चौहान
केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील गट नंबर 245/1 या क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी असणार्‍या वहीवाटीच्या रस्त्यावरील गट नंबर 217/1 मधील अतिकमण काढून बंद असलेला रस्ता व गट नंबर 217/3 मधील अतिक्रमण काढून रस्ता येण्या जाण्यासाठी खुला करावा यासाठी 2022 मध्ये केस क्रमांक 27/2022 दाखल करण्यात आली. त्यानुसार तहसीलदार यांनी योग्य ती चौकशी करून स्थळ निरीक्षण पंचनामा करून त्यानुसार तहसिलदार शेवगाव यांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासाठी 13 ऑगस्ट 2023 रोजी आदेश दिला. त्या आदेशानुसार संबंधित शेतकर्‍याने दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी रस्ता खुला करण्याकामी शेवगाव तहसिलदाराकडे अर्ज केला. त्यानंतर  5 फेबु्रवारी 2024 पुन्हा तहसिलदार यांना स्मरणपत्र देण्यात आले. त्यानुसार पोलीस संरक्षण घेऊन 19 मार्च 2024 रोजी खुला करण्यासाठी संबंधी भातकुडगाव मंडलधिकार्‍या मार्फत नोटीस देऊन रस्ता खुला करण्यासाठी हजर झाले. मात्र त्यांनी रस्ता खुला केला नाही.
यासंबधी दत्तु चंद्रभान आगळे यांनी शेवगाव कार्यालय येथे तहसीलदार यांची समक्ष भेट घेऊन यासंबंधी माहिती दिली. मात्र रस्ता खुला झाला नाही. म्हणून त्यांनी तहसीलदार शेवगाव यांच्या आदेशाप्रमाणे रस्ता खुला करावा, 19 मार्च 2024 रोजी रस्ता खुला करणे कामी मंडलाधिकारी व भायगाव सजेचे कामगार तलाठी यांच्या विरुद्ध रस्ता खुला करणे कामी तहसीलदार यांच्या आदेश आदेश पालन न केल्यामुळे त्यांची चौकशी होऊन कार्यवाही करण्यात यावी व भातकुडगाव मंडलाधिकारी यांना17 ते 20 पर्यंत या कालावधीत रस्ता केस मधील सामनेवाले अगर रस्ता केसच्या संदर्भात कोणाकोणाचे फोन आले याचा तपशील घेऊन मंडलाधिकार्‍याविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागण्यासह दिनांक दि. 27 मार्च 2024 पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, प्रांताधिकारी पाथर्डी भाग पाथर्डी, तहसीलदार शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन, यांना पाठवण्यात आले आहेत.

COMMENTS