Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगवी पाटण येथील शेतकर्‍यांचे अवकाळी पावसामुळे झाले नुकसान…

आष्टी प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील शेतकर्‍यांचे अचानक आलेल्या वादळी वारे सह पावसामुळे कांदा,गहू,मका  पिकांचे मोठ्या प्रमाणात

अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 
बिबट्यानंतर आता तरस शिरले घरात; नागरिकांमध्ये घबराट

आष्टी प्रतिनिधी – आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील शेतकर्‍यांचे अचानक आलेल्या वादळी वारे सह पावसामुळे कांदा,गहू,मका  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,सांगवी पाटण येथील युवा शेतकरी ऋषिकेश खोटे यांच्या शेतामधील 1 ऐकर मका,जमीन दोष झाली आहे,1 ऐकर कांदा व गहू यांचे नुकसान झाले आहे,शेतकर्‍यांच्या मालाला अगोदरच भाव नाही त्यामध्ये असं दुहेरी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत,आष्टी तालुक्यातील धामणगाव गटात सर्वाधिक पाऊस झाला आहे,काल धामणगाव येथील हगामा पावसामुळे रद्द करण्यात आला तर, गौतमी पाटील यांचा सुप्रसिद्ध कार्यक्रम पावसामुळे धामणेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी रसिकांनी तुफान गर्दी केली होती,वादळी वार्‍यामुळे कारखेल बुद्रुक येथील लमाण तांडा येथील शाळेवरील पत्रे व आठ ते दहा घरावरील पत्रे  उडून गेले,सुरुडी येथील शेतकरी  शेळ्या  चारण्यासाठी घेऊन  गेलेल्या शेतकर्‍यांने  पावसा दरम्यान झाडाचा आसरा घेतला होता,त्यावेळी शेतकर्‍यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर दोन शेळ्याही दगावल्या, त्यामुळे आष्टी तालुक्यातील धामणगाव गटात सर्वाधिक नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी केली आहे..

COMMENTS