Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी घेतली ऊस शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

लातूर प्रतिनिधी - वैशालीनगर, निवळी, येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. येथे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतक-यांना ऊस शेतीमध्ये दिवसेंदिवस होत असले

मोदींनी भाजपची कमान हाती घेतल्यापासून पक्षाने मागे वळून पाहिले नाही… अमित शहांची स्तुतीसुमने
दहशतवादाची पाळेमुळे
महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे राजकीय स्टंट – रवी राणा 

लातूर प्रतिनिधी – वैशालीनगर, निवळी, येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. येथे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतक-यांना ऊस शेतीमध्ये दिवसेंदिवस होत असलेले बदल आणि आधुनिक ऊस शेतीचे ज्ञान देता यावे यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आणि ऊस विकास परिसंवाद कार्यक्रम शेतकी विभागातील कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या परिषदेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी (बु) पुणे येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या वेळी शेतक-यांनी ऊस शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
विलास सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी गुरूवार, दि. 17 ऑगस्ट रोजी एक दिवसीय प्रशिक्षण आणि ऊस विकास परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथील शास्त्रज्ञ व मुख्य जनसंपर्क अधिकारी आर. बी. भोईटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. जी. दळवी, डॉ. जी. आर. पवार आणि वरिष्ठ ऊस रोग विकृती शास्त्रज्ञ डॉ. जी. एस. कोटगिरे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन डिग्रसे यांनी मार्गदर्शन केले. विलास सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच ऊस विकासाचे नवनवीत तंत्र कारखाना कर्मचारी आणि सभासद, ऊस उत्पादक यांना अवगत व्हावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. राज्याचे माजी वैद्यकीय व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख व कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून ऊस शेतीमध्ये वेळेनुसार होणारे बदल व आधुनिक ऊस शेती पध्दती यांचा अभ्यास होण्यासाठी व त्यांचा वापर कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांना करता यावा या करीता एक दिवसीय प्रशिक्षण व ऊस विकास परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी (बु) लातूर येथे पुणे यांच्या तज्ज्ञामार्फत शेतकी विभागातील कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. या वेळी तज्ज्ञांनी ऊस लागवड, निंदणी, पाणी व्यवस्थापन, खते व्यवस्थापन, कीटकनाशक व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, ऊस तोडणी आणि ऊस गाळप या विषयांवर ऊस उत्पादकांना मार्गदर्शन केले. त्यांनी ऊस शेतीमध्ये वेळेनुसार होणारे बदल आणि आधुनिक पद्धती यांचा वापर करून ऊस उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल ऊस उत्पादकांना माहिती दिली. तज्ज्ञांना ऊस उत्पादकांनी ऊस शेतीशी संबंधित विविध प्रश्न विचारले. ऊस उत्पादकांच्या या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. ऊस उत्पादकांना ऊस शेतीमध्ये वेळेनुसार होणारे बदल आणि आधुनिक पद्धतीचा वापर करून ऊस उत्पादन वाढवता येईल याची माहिती मिळाली. प्रास्ताविक करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी ऊस उत्पादकांची हेक्टरी ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण ऊस विकासाचे उपक्रम आपल्या कारखान्याकडून सातत्याने राबविले जातात. या पुढेदेखील अशा प्रकारचे उपक्रम आणि योजना कारखाना परिसरामध्ये राबविल्या जातील, असे सांगितले. या एक दिवसीय प्रशिक्षण व ऊस विकास परिसंवादात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथील तज्ज्ञ आर. बी. भोईटे, डॉ. एस. जी. दळवी, डॉ. जी. आर. पवार व त्यांच्या सोबत डॉ. जी. एस. कोटगिरे यांनी मार्गदर्शन केले. सदरील एक दिवसीय परिसंवाद व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सूत्रसंचलन शेख यांनी केले तर अभार एस. डी. नरवडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ऊस विकास अधिकारी जहागीरदार सी. एम., शेतकी अधिकारी आनेराये एस. एस., कृषी पर्यवेक्षक, सोमासे, देसाई, मेंढेकर, पाटील, नवनाथ पाटील, कदम सर्व कृषी मदतनिस व सर्व शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निकम ए. एन., भिसे एस. डी., दिलीप सोनकांबळे, दगडु काटकर, सूर्यवंशी एस. एस. यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS