म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे, वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसा

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे, वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ पध्दतीने समान पाणी वाटप व्हावे. या मागण्यांसाठी आज येथे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात येथील श्री सिध्दनाथ मंदिरापासून झाली. शिवाजी चौक, बाजारपेठ, रामुस वेस, एसटी बसस्थानकमार्गे मार्गक्रमण करत मोर्चा येथील अतिरिक्त तहसीलदार कार्यालयावर धडकला. या वेळी तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर आणि चव्हाण यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
COMMENTS