Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी हवालदिल

जळगाव प्रतिनिधी - चोपडा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र शेतातील उभे असलेले प

सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा
कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्याला विकावा लागत आहे कमी भावात कापूस
पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस

जळगाव प्रतिनिधी – चोपडा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र शेतातील उभे असलेले पीक या वादळामुळे जमिनीवर आडवे पडले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतातील पीक डोळे समोर आडवे पडलेले पाहून शेतासाठी लागलेला खर्च कसा निघेल या संकटात सापडला आहे. तर काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस आल्याने तीच चिंता असताना निसर्गाने या वादळामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून  घेतला आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पन्नातून कर्ज फेडले गेले असते, कर्ज नाही तर कमीत कमी त्या कर्जावरील व्याज तरी फेडले गेले असते, अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकरी करीत आहेत. 

COMMENTS