Homeताज्या बातम्यादेश

शेतकरी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर दाखल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः पंजाबमधून जंतरमंतरवर पोहोचलेल्या शेतकरी संघटनेच्या लोकांनी गोंधळ घातला. आंदोलक शेतकरी बॅरिकेडिंग तोडून आत जाण्याचा प्रयत्न

कुरघोडी करण्याऱ्या चीनला खडसावले
नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत
अभिनेत्री माधुरी पवारच्या भावाचे निधन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः पंजाबमधून जंतरमंतरवर पोहोचलेल्या शेतकरी संघटनेच्या लोकांनी गोंधळ घातला. आंदोलक शेतकरी बॅरिकेडिंग तोडून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी बॅरिकेडिंग खाली आणून ओढत नेण्यात आले. पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असली आंदोलक काही ऐकण्याच्या तयारीत नाहीत. दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. आज 16 व्या दिवशीही कुस्ती शौकिनांचा विरोध सुरू असला तरी कालच्या पत्रकार परिषदेनंतर सकाळपासूनच विविध राज्यातील खाप पंचायतीशी संबंधित लोक पैलवानांच्या समर्थनार्थ पोहोचत आहेत. पंजाबमधील काही शेतकरी संघटनांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यावर जंतरमंतरवर आज गोंधळ झाला. आंदोलक शेतकर्‍यांनी बॅरिकेडिंग खाली करून बॅरिकेडिंग आत ओढले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

COMMENTS