Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू 

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात गव्हाणे वस्तीवरील शेतकरी शेताता पाणी भरण्यासाठी गेले असताना  बिबट्याने हल्ला करुन जागीच ठार केल

ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यास मान्यता
विद्युत  वितरणचा लहरी कारभार दीडशे गावे अंधारात
राज्यातील अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात गव्हाणे वस्तीवरील शेतकरी शेताता पाणी भरण्यासाठी गेले असताना  बिबट्याने हल्ला करुन जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.या हल्ल्यात शोभाचंद उर्फ बोजी सिताराम गव्हाणे ( वय ५५ वर्ष) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

                   याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडनेर येथिल गव्हाणे वस्तीवरील शोभाचंद गव्हाणे हे पहाटे ४ वा. मकाच्या  पिकास पाणी देण्यासाठी गेले असता मकाच्या पिकात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शोभाचंद पाण्याचे बारे मोडण्यासाठी वाकल्यावर बिबट्याने पाठीमागील बाजुने शोभाचंद गव्हाणे यांच्यावर झडप घातली.बिबट्याशी गव्हाणे यांनी एकाकी झुंज दिली. मोठ्याने आरडा ओरड केली.परंतू जवळपास कोणीच नसल्याने मदतीला कोणीही पोहचू शकले नाही.बिबट्याने गव्हाणे यांना विविध ठिकाणी चावा घेतल्याने गव्हाणे यांचा प्रतिकार कमी झाल्याने मानेचा भाग व पोटाचा पुर्ण भाग बिबट्याने खाल्ला आहे.पोटातील आतडे बाहेर आले होते.सकाळ पर्यंत शोभचंद गव्हाणे शेतातून घरी का परतले नाही हे पाण्यासाठी कुटुंबातील सदस्य पाहण्यासाठी गेले असता  ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

COMMENTS