राहुरी/प्रतिनिधी ः पावसाची झालेली वक्रदृष्टी पाहता शेतकरी हतबल झाला असून शेतकर्यांची पिके धोक्यात आले आहेत. जनवारांच्या चार्याचा प्रश्न गँभीर
राहुरी/प्रतिनिधी ः पावसाची झालेली वक्रदृष्टी पाहता शेतकरी हतबल झाला असून शेतकर्यांची पिके धोक्यात आले आहेत. जनवारांच्या चार्याचा प्रश्न गँभीर बनला असल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. देवळाली प्रवरा व गुहा येथील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी वरुणराजाला साकडे घालण्यासाठी पर्जन्य यज्ञ करण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा येथील मॉर्निंग वॉकसाठी जाणारे राजेंद्र शेरकर, राजेंद्र लोंढे व बिटू पवार यांनी आज सकाळी पर्जन्य यज्ञ करण्याचा संकल्प केला.त्यानुसार सर्व तयारी करून देवळाली प्रवरा हद्दीत नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या गवळी माळ येथे पर्जन्य यज्ञ करून पर्जन्य सुक्त पठण करून भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना केली. यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, शेतकरी नेते राजेंद्र लोंढे, कामगार नेते नानासाहेब कदम, जिल्हा बँकेचे अधिकारी राजेंद्र शेरकर, बिटू पवार, सोसायटीचे संचालक मंजाबापू वरखडे, अनंत कदम, संजय कदम, गोरख कदम, सुभाष पठारे, सुनील सिनारे, बाबासाहेब मोरे, शांताराम मोरे, सोमनाथ कोळसे, धनंजय कोळसे, प्रणय कोळसे, गिरीश कदम, संकेत ढुस, प्रकाश ढुस, वसंत दौंड, गणेश बर्डे, अजित वरखडे, शरद वाबळे, सुधा कदम, हेमंत कदम, वसंत वरखडे, अभिजित नालकर, तेजस वरखडे, चैतन्य वाबळे, सौरभ कवाणे, पवन कदम, गौरव कोळसे आदींसह गुहा व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS