नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा आपले आंदोलन तीव्र करण्याची शक्यत आहे. केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नसल्याचे सांगत शेतकर्यांनी हरियाणा-पंजा
नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा आपले आंदोलन तीव्र करण्याची शक्यत आहे. केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नसल्याचे सांगत शेतकर्यांनी हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमवरून राजधानी दिल्लीकडे 21 जानेवारीला कूच करणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये 101 शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले.
शेतकर्यांनी डिसेंबर महिन्यात शेतकर्यांनी तीनवेळा दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आहे. 6 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 14 डिसेंबर 2024 रोजी शेतकरी दिल्लीला रवाना झाले होते, परंतु तीनही वेळा हरियाणा पोलिसांनी त्यांना बॅरिकेडवर रोखले. शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी एमएसपी हमी कायद्याबाबत 11 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल 52 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
COMMENTS