Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 श्रीरामपूर मध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक

अहमदनगर प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या वीज वितरणच्या भोकर सबस्टेशन येथील गलथान कारभाराविरोधात आज तालुक्यातील भोकर,

श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार
राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत धमाल मेळावा उत्साहात
निळवंड्याच्या कथित तारणहाराला उशिरा का होईना उपरतीः विखे

अहमदनगर प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या वीज वितरणच्या भोकर सबस्टेशन येथील गलथान कारभाराविरोधात आज तालुक्यातील भोकर, खोकर, मूठेवाडगाव, माळवाडगाव, कमालपूर, टाकळीभान व कारेगाव परिसरातील भागातील शेतकऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा यांना घेराव घातला. येत्या दोन दिवसात महावितरण कडून सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी संतप्त व्यक्त केल्या. यावेळी परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला होता.

COMMENTS