नागपूर ः येथील 28 वर्षीय तरुण शेतकर्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घरातील पत्रा शेडच्या छताला असलेलेल्या रॉडला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या

नागपूर ः येथील 28 वर्षीय तरुण शेतकर्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घरातील पत्रा शेडच्या छताला असलेलेल्या रॉडला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले. विकास नाईक असे या शेतकर्याचे नाव आहे. तो टेकाडी गावचा ररिहवासी आहे. शेतीसाठी उचललेल्या कर्जाची परतफेड कशी करायची यामुळे तो सतत चिंतेत असायचा. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. नागपूर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. चौकशीनंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येऊ शकणार आहे. पोलिसांनी सांगितले की, विकास आणि त्याचा भाऊ आशिष हे कंत्राटी शेती करत असत. या शेतीसाठी त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतात कापूस आणि तूर लागवड करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून काही पैसे उधार घेतले होते. पीक चांगलेही आले होते. मात्र, पिकावर अचानक रोग आला आणि काही वन्य प्राण्यांचाही हल्ला झाला. त्यामुळे पिकाचे मोठेच नुकसान झाले होते.
COMMENTS