वर्धा प्रतिनिधी - सेवाग्राम नजीकच्या पुजई येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात मेक्सिकन पेपरिका मिरचीचे पीक घेतले आहेय. मिरची म्हटले की तोंडाला

वर्धा प्रतिनिधी – सेवाग्राम नजीकच्या पुजई येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात मेक्सिकन पेपरिका मिरचीचे पीक घेतले आहेय. मिरची म्हटले की तोंडाला तिखट झोंबतं. पण या मिरचीच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर चवीच्या बाबतीत या मिरचीत वेगळेपणा आहेय. चवीला अत्यंत सौम्य तिखट असणाऱ्या या मिरचीचा उपयोग विदेशात मोठ्या प्रमाणात होतो. आरोग्यासाठी महत्वाची मिरची समजली जाणारी ही मिरची फास्ट फूड मध्ये देखील वापरली जाते. पूजई येथील मिलिंद भाणसे या शेतकऱ्याच्या दोन एकर शेतात बहरलेल्या या मिरची मधून साडेसात लाख रुपयांचे उत्पादन होईल अशी आशा शेतकऱ्याला आहे. त्याच गणित देखील हा शेतकरी मांडतो आहे.
हे आहे पुजई येथील शेतकरी मिलिंद भाणसे.. त्यांनी आपल्या दोन एकर शेतात पेपरिका मिरचीची लागवड केली. ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यानंतर वेळोवेळी निंदन, खुरपन आणि फवारणी करण्यात आली. झाडे मोठी झाल्यावर त्याच्या संगोपनासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता या मिरचीच्या झाडांना चांगले उत्पादन झाले आहे. एकाच झाडाला 40 ते 50 मिरच्या लागल्या आहे. शेतकऱ्याला मोठ्या उत्पादनाची अपेक्षा आहे. मिरचीचा आकार पहिला तर लांब आणि ढोबळ असा आहे. वजनाने देखील ही मिरची जास्त आहे. एकाच झाडाला 40 ते पन्नास च्या घरात मिरच्या असल्याने निश्चितच यातून भरघोस उत्पन्न होईल असेच चित्र आहे.
मिलिंद भाणसे यांना पेपरिका मिरची विषयी माहिती मिळाली तेंव्हापासून त्यांनी याची पुरेपूर माहिती गोळा करायला सुरुवात केली. विविध ठिकाणी पोहचून शेतकऱ्यांचे अनुभव देखील समजून घेतले. त्यांनतर कंपनीकडून या मिरचीचे बियाणे खरेदी केले आणि ऑक्टोबर महिन्यात मिरचीची रोपे तयार केली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिरची लागवड करण्यात आली. 2 बाय 6 इंच या अंतरावर लागवड करून एका एकरात 40 हजार इतकी झाडं लावली गेली. पाण्याची शेतातच मुबलक व्यवस्था असल्याने वेळोवेळो मिरचीला पाणी देण्यात आले. शेतीत आतापर्यत उत्पादन खर्च सव्वा लाख रूपयांच्या घरात आला आहे. आणि आता पुढे हार्वेस्टिंग साठी देखील खर्च अपेक्षित आहे. अडीच टन उत्पादन होईल अशी अपेक्षा मिलिंद भाणसे यांनी व्यक्त केली आहे. साडेसात लाख रुपयांचे उत्पादन आणि लागवड ते हार्वेस्टिंग असा एकूण दोन लाख रूपयांचा खर्च वजा जाता साडेपाच लाख रूपयांचे उत्पादन निश्चित होईल असा विश्वास मिलिंद भाणसे यांना आहे.
शेतीतून मिळणार पिक नवीन प्रयोगातून भरभराटी मिळवून देणारे ठरू शकते हेच या शेतकऱ्याच्या प्रयोगातून दिसून येत आहे.
COMMENTS