Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिक विम्याचे पैसे मिळावे म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्याचा प्रयत्न

नांदेड प्रतिनिधी - पिक विम्याचे 29, हजार रुपये परस्पर खात्यावरुन उचलून फसवणुक केली. संबंधितावर योग्य ती कार्यवाही करुन ऑनलाईन केंद्रचा परवाना रद्

लातूर जिल्ह्यात मोतिबिंदुच्या 23506 शस्त्रक्रिया
जमिनीचा वाद पेटला, रस्त्यात अडवून शेतकर्‍याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून
उजनीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्तारोको

नांदेड प्रतिनिधी – पिक विम्याचे 29, हजार रुपये परस्पर खात्यावरुन उचलून फसवणुक केली. संबंधितावर योग्य ती कार्यवाही करुन ऑनलाईन केंद्रचा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विष पिवून आत्महत्या करीत असे निवेदन देऊन पुंडलिक बोलके यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी यांना दिले होते परंतु त्याचा काही उपयोग न झाल्यामुळे शेवटी आज दि.10 सोमवारी जिल्हा अधिकारी कार्यालयात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला असता तेथील उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी ताब्यात घेऊन त्यांचा त्यांचा जीव वाचवला.
पुंडलीक लोभाज बोलके रा. कवाना ता. हदगाव जि.नांदेड येथील रहिवाशी असून इ.स.2020 मध्य पिकविमाचे पैसे ऑनलाईन केंद्र चालक पांडुरंग ननरे रा. चिंचगव्हाण ता. हदगाव जि. नांदेड यांच्याकडे अंगठा लावून पिकविम्याचे पैसे उचलण्यास गेलो होतो. पंरतु तिथे केंद्र चालक पांडुरंग ननरे यानी सांगीतले की, तुमचा अंगठा बरोबर येत नाही. त्यामुळे खात्यावरची रक्कम उचलता येत नाही. मग मी घरी निघुन गेलो .पंरतु पुन्हा त्याचेकडे सारखे तीन चार महिने पुन्हा जावून पैसे उचलण्याचा प्रयत्न केला .परंतु परत पांडुरंग याने सांगीतले की, तुमचे पैसे आलेच नाही. त्यामुळे मी पुन्हा रिकाम्या हाती निघून गेलो. नंतर मला सहा महिण्यानी एटीएम कार्डने खात्यावरील रक्कम काढण्यास गेलो असता त्यावरील रक्कम 29,200/- रुपये उचलून घेतले व माझी फसवणुक केली आहे. मग सदर दुकानदार यास मी पैशाबदल बोललो तर ते म्हणाला की तुम्हाला मी नंतर पैसे देवून टाकतो. त्यामुळे मी आतापर्यंत त्याची वाट पाहिली. पंरतु पैसे त्याने दिले नाहीत. तरी माझे पैसे त्यांचेकडून  रुपये वसूल करुन देवून त्याचा परवाना कायमचा रद्द करण्यात यावा, अन्यथा मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दि.10 एप्रिल 23 रोजी विष पिवून आत्महत्या करणार आहे .या आशयाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते . परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS