Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘यादो की बारात’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्‍ध

डी. जे. रिअल्‍टर्स प्रस्‍तुत कराओके ट्रॅक शोला मिळाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

नाशिक- श्रावण मासाच्‍या रम्‍य सायंकाळी सुरांचा साज चढवितांना सदाबहार गाण्यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवायला मिळाले. गायकांमधील उत्‍साह पाहून रसिका

सीएसआरडीचे डॉ. सुरेश पठारे यांची राष्ट्रीय पातळीवर बहुमताने निवड
जागतिक विमा परिषदेसाठी धनश्री कडलग यांची निवड
पंतप्रधान मोदी युक्रेनला देणार भेेट

नाशिक- श्रावण मासाच्‍या रम्‍य सायंकाळी सुरांचा साज चढवितांना सदाबहार गाण्यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवायला मिळाले. गायकांमधील उत्‍साह पाहून रसिकांमध्येही ऊर्जा संचारल्‍याचे चित्र रविवारी (दि.१३ ऑगस्‍ट) गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्‍मारक येथे पहायला मिळाले. श्री. शरद सोनवणे अमळनेरकर, आयोजित डी. जे. रिअल्‍टर्स प्रस्‍तुत ‘यादो की बारात’ या कराओके ट्रॅक शोला रसिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्‍या प्रतिमेला वंदन करण्यात आली. याप्रसंगी गायकांचे मार्गदर्शक विवेक केळकर, नंदू देशपांडे, आणि नमिता राजहंस यांची प्रमुख उपस्‍थिती होती. कार्यक्रमात प्रशांत चंद्रात्रे, शरद सोनवणे, ज्ञानेश्‍वर धामणे यांच्‍यासह गायिका भाग्‍यश्री गायधनी, मनुजा रत्‍नपारखी यांनी सुरेल आवाजात गायन केले. प्रारंभी भाग्‍यश्री गायधनी व मनुजा रत्‍नपारखी यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ या देशभक्‍तीवर आधारित गाण्याने करतांना सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर ज्ञानेश्‍वर धामणे यांनी ‘मुबारक हो सबको’ व ‘कभी कभी मेरे दिलमे’ गाणं म्‍हणतांना उपस्‍थितांचे निखळ मनोरंजन केले. यावेळी सोलो व ड्युएट स्‍वरुपाची गाणी सादर करण्यात आली. ‘चंदा देखे चंदा’ आणि ‘क्या यही प्यार है’ ही गाणी प्रशांत चंद्रात्रे व मनुजा रत्‍नपारखी यांनी सादर केले. ‘दिल दिवाना बिन’ गाण्याने शरद सोनवणे यांनी दमदार सादरीकरण केले. यानंतर कार्यक्रमादरम्‍यान ‘मेरे ख्वाबो मे’, ‘क्या जानू सजन’, ‘हमतूम चोरीसे’, ‘छोड दो आचल’, ‘देखा है पहली बार’, ‘राम करे ऐसा’ अशी विविध गाणी सादर करतांना रसिकांना मंत्रमुग्‍ध केले. प्रत्‍येक सादरीकरणाला उपस्‍थितांनी उत्‍स्‍फूर्त दाद देतांना गायकांचे प्रोत्‍साहन वाढविले. देशाचा स्‍वातंत्र्यदिन साजरा करत असतांना या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन सुहासिनी बुरकुले यांनी करतांना कार्यक्रमाची रंगत वाढविली.

रसिकांचा मिळाला प्रतिसाद – कार्यक्रमाला रसिकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्‍येक गाण्याच्‍या सादरीकरणाला टाळ्या व शिट्यांच्‍या स्‍वरुपात दाद देतांना गायकांचे प्रोत्‍साहन वाढविले. काही गाण्यांना ‘वन्‍स मोर’ची मागणी उपस्‍थित रसिकांकडून करण्यात आली.

COMMENTS