Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध पॉपस्टार मूनबिनचा वयाच्या 25 व्या वर्षी मृत्यू

दक्षिण कोरिया प्रतिनिधी - प्रसिद्ध कोरियन पॉप स्टार आणि के-पॉप बँड अ‍ॅस्ट्रोचा गायक मूनबिन याने वयाच्या 25 व्या वर्षी निरोप घेतला आहे. माध्यमा

रेल्वेची 25 टक्क्यांपर्यंत भाडेकपात
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबईच्या 99 वर्ष जुन्या गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीला तडे

दक्षिण कोरिया प्रतिनिधी – प्रसिद्ध कोरियन पॉप स्टार आणि के-पॉप बँड अ‍ॅस्ट्रोचा गायक मूनबिन याने वयाच्या 25 व्या वर्षी निरोप घेतला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मूनबिन त्याच्या सियोलमधील गंगनम-गु येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. मूनबिनच्या निधनाचे वृत्त समोर येताच त्याच्या जगभरातल्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वृत्तानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मूनबिनने आत्महत्या केली आहे आणि मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन करण्याचा विचार केला जात आहे. सोल गंगनम पोलिसांच्या म्हणण्यानुसार मूनबिनच्या व्यवस्थापकाने सांगितले की त्याच्या घरी रात्री 8:10 वाजता तो मृतावस्थेत आढळला होता. काही वेळातच व्यवस्थापकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. “आम्ही सध्या मूनबिनच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यावर चर्चा करत आहोत. पण मूनबिनने स्वतःचा जीव घेतल्यासारखे दिसते आहे, असे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS