Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तोतया सीबीआय अधिकार्‍याला अटक

मुंबई : बनावट ओळखपत्र दाखवून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील लॉजवर शोध मोहीम राबवणार्‍या तोतयाला पोलिसांनी रंगेहात पकडले. तोतया

लोकसभा अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
बोकड कापण्याच्या सुर्‍याने तरुणावर जीवघेणा हल्ला
लाच घेतांना बारामतीतील पोलिस हवालदार गजाआड

मुंबई : बनावट ओळखपत्र दाखवून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील लॉजवर शोध मोहीम राबवणार्‍या तोतयाला पोलिसांनी रंगेहात पकडले. तोतयागिरी केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील लॉजवर आरोपी सोमवारी गेला होता. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने तेथील कर्मचार्‍यांना सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. त्यानंतर त्याने लॉजमधील ग्राहकांची नोंदवही तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने ग्राहकांच्या खोलीत जाऊन तपासणी करण्यास सुरूवात केली. तसेच ग्राहकांच्या ओळखपत्रांचे छायाचित्र घेण्यास सुरूवात केली होती.

COMMENTS