Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महानगरपालिके तर्फे शासकीय योजनांची जत्रा

सर्वसामान्यांचा विकास व लोक कल्याण अभियानाला सुरुवात

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - राज्य सरकारने सुरू केलेल्या शासकीय योजनांची जत्रा सर्वसामान्यांच्या विकास व लोक कल्याणाकरिता या अभियाना अंतर्गत

प्रदूषण प्रकरणी कारवाईसाठी महापालिकेची विशेष पथके तैनात
महानगरपालिकेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेयांना अभिवादन
जनता पँथरच्यावतीने महानगरपालिकेवर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – राज्य सरकारने सुरू केलेल्या शासकीय योजनांची जत्रा सर्वसामान्यांच्या विकास व लोक कल्याणाकरिता या अभियाना अंतर्गत महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र रुग्णालयांमधून शासकीय योजनांची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत परिसरामध्ये या योजनांची माहिती देण्यासाठी जनजागृती सुरू आहे. यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना अंतर्गत मोफत रक्त, लघवी चाचण्या व थायरॉईड टेस्ट सुविधा, प्रधानमंत्री मातृत्व वर्णन योजना अंतर्गत पहिल्यांदा गरोदर मातांना पाच हजार रुपये आर्थिक लाभ, जननी सुरक्षा योजना अंतर्गत एससी एसटी बीपीएल गरोदर मातांना मानांकित दवाखान्यात उपस्थित झाल्यास आर्थिक लाभ दिला जातो. इतर शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शहरातील आरोग्य केंद्र मार्फत शिबिर घेण्यात येत आहे.             

COMMENTS