फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला : एकनाथ शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला : एकनाथ शिंदे

मुंबई : भाजपकडे 106 आणि अपक्ष आमदारांचे मोठे पाठबळ असतांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना होता आले असते, आमची देखील तीच इच्छा होती. मात्र त

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात नायजेरियन महिलेला अटक
माजी क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचे निधन
भारत-मॉरिशसमध्ये अनेक सामंजस्य करार

मुंबई : भाजपकडे 106 आणि अपक्ष आमदारांचे मोठे पाठबळ असतांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना होता आले असते, आमची देखील तीच इच्छा होती. मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी माध्यमांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. शिवसेना पक्ष म्हणून कायदेशीर प्रक्रीया करून शिवसेनेचे तसेच अपक्ष आमदार मिळून आम्ही गेले काही दिवस एकत्र आहोत. अडीच वर्षापूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे, गेल्या काही काळामध्ये मुख्यमंत्र्यांना मतदारसंघातील समस्या विकास प्रकल्प याबाबत वारंवार माहिती दिली, दुरूस्तीची मागणी केली, अनेक वेळा चर्चा केली, पण मविआ बाबत आमदारांमध्ये नाराजी होती, मतदार संघातील प्रश्‍न पाहाता पुढच्या निवडणूक लढताना येणार्या अडचणी हे लक्षात घेत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले. आपण विरोधकांकडून सत्तेत जात आसतो पण मागील घटनाक्रम बघीतला तर सत्तेतून विरोधकांकडे जाण्याचा प्रकार घडला असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत होतो पण महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते, बाळासाहेंबांचं हिंदुत्व घेऊन पुढे जात असताना घेतलेल्या काही निर्णयाचं स्वागत आहे, पण हे पूर्वीच आपण करायला हवं असे शिंदे यावेळी म्हाणले. 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ याचं कारणं याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. 50 लोक एकत्र आले, मला असलेल्या अडचणी सोडा पण या 50 जणांना मतदारसंघात येत असलेल्या अडचणी पहाता हा निर्णय घ्यावा लागला असेही शिंदे म्हणाले. आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, भाजपकडे 120 चे संख्याबळ आहे. असे असताना मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मनाचा मोठेपणा दाखवला यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद पाहिजे असं काही नव्हते. जे घडले ते वास्तव तुमच्यासमोर होते, राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम आपण करू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS