Homeताज्या बातम्यासंपादकीय

फडणवीस सचोटीचे नेते !

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सचोटीचे नेते आहेत, हे त्यांचा राजकीय शत्रूही मान्य करेल. कालपासून सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान च

स्वातंत्र्यदिनापासून रात्री 10 पर्यंत स्वातंत्र्य…करा मजा…; नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन अखेर शिथील, मंदिरे व सिनेमागृहे मात्र राहणार बंद
राहाता तालुक्यातील गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल  
स्नेहलता कोल्हे यांनी स्वतः भरुन दिले लाडक्या बहीणींचे अर्ज

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सचोटीचे नेते आहेत, हे त्यांचा राजकीय शत्रूही मान्य करेल. कालपासून सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान चर्चेत आहे की, ‘मला हलक्यात घेऊ नका!’ राजकारणात कोणतेही विधान करताना त्यामागे पार्श्वभूमी असते. शिंदेंच्या वक्तव्यामागे देखील पार्श्वभूमी असणारच! खरेतर, जालना जिल्ह्यात शिंदे मुख्यमंत्री असताना, ९०० कोटींचा एक प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहे. फडणवीस हे राजकारणात आणि राजकीय सत्तेत नेहमी दक्ष असतात. त्यांना प्रकल्पात संशय आल्याखेरीज ते सहसा अशा प्रकारचे निर्णय घेणार नाहीत. राजकारणात सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असणारं व्यक्तिमत्व म्हणून फडणवीस यांना ओळखले जाते. एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा त्यांचा हेतू निश्चितपणे नाही आणि नसेल. परंतु, एखाद्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत चुकीचे प्रकल्प उभारले गेले तर, नंतर पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्या चुकीच्या प्रकल्पाची किंमत मोजावी लागते. हे महाराष्ट्राच्या ‘आदर्श’ सोसायटी प्रकल्पात महाराष्ट्रात अनुभवाला आले आहे. ‘आदर्श’ सोसायटीच्या निर्मितीत अशोक चव्हाण यांचा थेट सहभाग नव्हता. परंतु, त्याच सोसायटी वरून त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते, हे महाराष्ट्राच्या अनुभवाला आले आहे. असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडू नये, याची काळजी घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजी घेत आहेत. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा वेगळा अर्थ काढत आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दरी वाढत असल्याच्या अटकळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना त्यांना हलके न घेण्याचा इशारा दिला. फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना वारंवार टाळणारे शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पतनाचा संदर्भ देत, त्यांना हलकेच घेतले तेव्हा त्यांनी तत्कालीन सरकार उलथवून टाकले असा दावा केला.शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मंजूर झालेल्या जालन्यातील ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर ही टिप्पणी आली. प्रकल्पाची वैधता आणि शिंदे यांच्या मंजुरीमागील कारण तथापि. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर, जिथे महायुती आघाडीने जिंकलेल्या २३० पैकी १३२ जागा भाजपने जिंकल्या. त्यामुळे शिंदे यांना फडणवीस यांच्यासाठी राज्यातील सर्वोच्च पदासाठी म्हणजे मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा करावा लागला. ही वस्तुस्थिती पाहता, मुख्यमंत्री फडणवीस शिंदे यांना अडचणीत आणण्याचे राजकारण करू शकत नाही. परंतु, माध्यम तशी आव‌ई उठवतात आणि चांगल्या सत्ताधाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची पहिली कारकीर्द देखील निष्कलंक राहीली आहे. याचे कारण चुकीच्या गोष्टी ते खपवून घेत नाहीत, हेच आहे. अर्थात, एखाद्या गोष्टीची वास्तवता तपासण्यामागे कोणाला अडचणीत आणणं हे नसतं, तर, त्यात अनवधानाने चुका राहू नयेत, हे त्यामागचे खरे कारण असते.तथापि, शिंदे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की मुख्यमंत्र्यांसोबत “कोणतेही शीतयुद्ध नाही”. शिंदे म्हणाले, “विकासाला विरोध करणाऱ्यांविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत.” हेच खरे आहे की, फडणवीस आणि शिंदे यांच्यात कसलाही विवाद नाही.

COMMENTS