Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात डोळ्यांची साथ फोफावली

तब्बल 2 लाख 48 हजार रुग्णांचे आले डोळे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात अनेक जिल्ह्यात डोळ्यांच्या संसर्गाची साथ फोफावली आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळयांची साथ चांगलीच फोफावतांना दिसून येत

सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन
अखेर अग्निपथ योजना वैध
नैसर्गिक शेती यापुढे कृषी शिक्षणाचा भाग असेल : कृषीमंत्री तोमर

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात अनेक जिल्ह्यात डोळ्यांच्या संसर्गाची साथ फोफावली आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळयांची साथ चांगलीच फोफावतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यभरात 2 लाख 48 हजार 851 डोळे संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहे. मुबंई, पुणे, ठाणे चंद्रपूर या जिल्ह्यात डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत.
डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण पाहता, आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करणार आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संसर्गाचा प्रादुर्भाव पाहून मुलांची शाळांमध्येही तपासणी होणार आहे. मुबंई, पुणे, ठाणे, बुलढाणा, जळगाव, पुणे, नांदेड, अमरावती, अकोला राज्यात डोळ्याचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. राज्यात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात मुबंई, पुणे, ठाणे चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त प्रमाणात आढळून आल्याने आरोग्य विभागाची पथक तैनात करण्यात आले आहेत. डोळ्याबरोबर मलेरिया, चिकन गुणियाचे ही रुग्ण आरोग्य विभागाची पथक तैनात केल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, धारशिव राज्यात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात असून मुबंई, पुणे, ठाणे चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त असून काळजीपोटी आरोग्य विभागाने पथक तैनात केली आहे. शाळेतील मुल असतील किंवा वयस्कर मानस यांची काळजी घेतली जात असून जास्त फैलाव होणार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे. डोळ्या बरोबर मलेरिया, चिकन गुणियाचे ही रुग्ण असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. नागरिकांनी या वाढत्या रुग्णाबाबत काळजी करू नये. आरोग्य विभागाची पथक तैनात करण्यात आली आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिली आहे.
देशभरात डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये डोळ्यांची साथ वेगाने पसरली आहे. अचानक या साथीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने आय ड्रॉपची मागणी वाढली. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. साथीचा प्रादुर्भाव वाढत असला तरी चिंतेचे कारण नाही. कारण रुग्ण लवकर बरे होत आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, तसेच दोन ते तीन आठवड्यात साथ कमी होईल असा अंदाज आरोग्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS