Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपहरण करून सांगली जिल्ह्यात नेणारे खंडणी बहाद्दर मुंबई पोलिसांच्या अटकेत  

मुंबई प्रतिनिधी - अपहरण केल्यावर खंडणीची मागणी करून एक महिना पर्यंत पैसे ठेवलेला एका इसमाची कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व बेळगाव जिल्हा व महारा

तहसील इमारतीने गाठला अस्वच्छतेचा कळस
‘चोरमंडळ’ प्रकरणी संजय राऊत गोत्यात
शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी – अपहरण केल्यावर खंडणीची मागणी करून एक महिना पर्यंत पैसे ठेवलेला एका इसमाची कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व बेळगाव जिल्हा व महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातून सुटका करण्यात मुंबईतील ना म जोशी मार्ग पोलिसांना मोठं यश आलं आहे. फिर्यादी महिला सुनीता काळे आणि त्यांचे पती फुलविक्रीचा धंदा करत असताना दोन व्यक्तींनी खोटे कारण सांगून सुनीता हिचे पती रमेश काळे याचे अपहरण केले. अपहरण करून गाव पांडरझरी, जत, सांगली येथे नेऊन त्याला डांबण्यात आले. तसेच डांबून ठेवल्यानंतर फिर्यादीकडून 7 लाखांची खंडणी मागण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, सदर प्रकरण हे उसतोडीचे पैसे घेतल्याचे वादावरून घडले आहे. यामध्ये आरोपी मयुरी चव्हाण आणि संतोष काळे यांनी इतर आरोपीस मदत करून खंडणी मागण्यासाठी चिथावणी देण्यात आली होती. तसेच बळीतास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या व गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीतून सदर कारवाई करण्यात आली आहे. 

COMMENTS