Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडे पाच लाखाचा गंडा

पुणे ः पुणे शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून, पुण्यातील उंड्री भागात राहणार्‍या एका तरुणीला वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने

पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून 61 लाखांची फसवणूक
नफा मिळवून देण्याच्या साडेतेरा लाखांची फसवणूक
व्यावसायिकाची 1 कोटी 21 लाखांची फसवणूक

पुणे ः पुणे शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून, पुण्यातील उंड्री भागात राहणार्‍या एका तरुणीला वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन साडे 5 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुप्रिया अंगदराव सरडे (वय-33) यांनी अज्ञात टेलिग्राम आयडीधारक व व्हॉटसअप क्रमांक धारक यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या त्यांचे उंड्री परिसरातील राहत्या घरी असताना त्यांना करिना रेड्डी नावाचे अज्ञात महिलेने मोबाईलवर संर्पक साधला. त्यांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने युटयुब चॅनलला सबस्क्राईब करुन त्याद्वारे चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले. तक्रारदार यांनी पार्टटाईम जॉबसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना मोबाईलमध्ये टेलीग्राम हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर एका टेलीग्राम ग्रुपमध्ये त्यांना अ‍ॅड करुन वेळोवेळी टास्क देण्यात आल. सदर टास्क पूर्ण करण्यास लावून काही प्रमाणात मोबदला दिला गेला. त्यामुळे तक्रारदार यांचा विश्‍वास संपादन करुन वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून साडे 5 लाख रुपये वेगवेगळ्या स्किममध्ये गुंतवून घेत त्याचा चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा मूळ रक्कम परत न करता सदर रकमेची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान दुसर्‍या एका घटनेत वाघोली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील अकाऊंटंट विनयकुमार रुपचंद भांडारकर (रा.मांजरी,पुणे) याने शाळेत काम करत असताना, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांना त्यांचे पाल्याचे प्रवेश ‘आरटीई कोट्यातून करुन देतो’ असे सांगितले. त्याकरिता काही पालकांकडून रोख किंवा सदर खात्यावर ऑनलाईन पैसे जमा करुन मी शाळेच्या खात्यात भरतो’ असे सांगत वेगवेगळी कारणे सांगून शाळेची तसेच पालकांची एकूण 13 लाख 65 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक व अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी शाळेच्यावतीने स्वानंद चंद्रकांत कुलकर्णी (रा. वाघोली,पुणे) यांनी आरोपी विरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS