Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खते, बी-बियाणांमध्ये शेतकर्‍यांची लूट

संभाजीराजे यांची कृषी खात्यावर टीका

पुणे ः राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर पेरण्यांना वेग येत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांकडून खते, बी-बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. म

आई-वडिलांवर घातक शस्त्राने हल्ला करण्याचा डाव उधळला
मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा नेत्यांचे आंदोलन
विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती

पुणे ः राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर पेरण्यांना वेग येत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांकडून खते, बी-बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. मात्र खते, बी-बियाणांमध्ये शेतकर्‍यांची लूट असल्याचा गंभीर आरोप स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी गुरूवारी केला आहगे. तसेच 266 रुपयांची खताची गोणी 800 रुपयांना दिली जातेय. शेतकर्‍यांना अशाप्रकारे लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढत आहे का? असा सवाल संभाजीराजेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. राज्यात शेतकर्‍यांची लूट सुरु असताना कृषीमंत्र्यांनी ग्राउंडवर येऊन काम करणे अपेक्षित आहे. मात्र, हे कृषीमंत्री व्हॉटसअ‍ॅपवर फेसबुकद्वारे ऑनलाईन तक्रारी मागवत असल्याचे म्हणत संभाजीराजेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली. मनोज जरांगे यांनी हाती घेतलेला विषय गरीब मराठी यांच्या हक्कासाठी आहे. जरांगे आणि सरकार यांच्यात नवी मुंबईत काय बोलणे झाले त्यांनाच माहिती आहे. हा विषय चिघळू नये यासाठी मनोज जरांगे आणि सरकार यांच्यात एकत्रित बसून चर्चा होऊन तोडगा काढला जावा अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. संभाजीराजे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकर्‍यांना 266 रुपयांची गोणी 800 रुपयांना मिळते. आम्हाला युरियाची गरज आहे म्हणून वाढीव किमतीला खरेदी केले जात आहे. तिप्पट पैसे घेऊन युरीया विक्री केली जात आहे. सरकारला आवाहन करायचे की, तुम्ही जर यावर कारवाई केली नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. जर कायदा सुव्यवस्थाचा प्रश्‍न उपस्थित झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल. खत गैरव्यवहार बाबत फसवणुकीचे जे रॅकेट आहे त्यांच्यावर मोका लावला पाहिजे कारण शेतकरी फसवणूक करणे हा गुन्हाच आहे. संघटित केलेले गुन्हेगारी कट हा असून खताचा स्टॉक दिसून ही नाही असे सांगितले जाते. शेतकर्‍यांना त्रास दिला जात असेल तर त्याबाबत स्वराज्य संघटना आंदोलन करेल. दुसर्‍या राज्यात शेतकर्‍यांना दिवसा वीज दिली जाते पण आपल्या राज्यात रात्री वीज दिली जाते त्यामुळे शेतकर्‍यांना शॉक लागणे, साप चावणे प्रकार घडत आहे. कृषिमंत्री यांनी सर्व राजकारण बाजूला ठेऊन मोबाईलवर आलेल्या तक्रारी केवळ न पाहता बांधावर जाऊन शेतकरी परिस्थिती पहावी. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी यांची खताच्या बाबत फसवणूक होऊ नये. यात जे बिल्डर, अधिकारी सहभागी आहे त्यांच्यावर कारवाई केली जावी. कृषी आयुक्त अजून राज्यात नाही ही शोकांतिका असल्याचा गंभीर आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.

COMMENTS