Homeताज्या बातम्यादेश

संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

नवी दिल्ली ः पक्ष नेतृत्वावर टीका करून शिस्तभंग केल्याप्रकरणी काँग्रेसने माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली आहे.

प्रा. डॉ. बापूसाहेब भोसले यांना डॉ. भास्कर राय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
अमोल कोल्हेंची शरद पवारांसोबत असल्याची घोषणा
उर्वशी रौतेलाने मागितली रिषभ पंतची माफी

नवी दिल्ली ः पक्ष नेतृत्वावर टीका करून शिस्तभंग केल्याप्रकरणी काँग्रेसने माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली आहे. दिल्लीतून पत्रक काढून काँग्रेसने ही कारवाई केली आहे. काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपमयांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र याला उत्तर देताना उद्यापर्यंत मीच मोठा निर्णय घेणार असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. त्यानंतर आता संजय निरुपम यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने दिल्लीतून संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वासह मित्रपक्षावर टीका करून पक्षाची शिस्तभंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. अखेर त्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

काँग्रेसमध्ये  5 सत्ताकेंद्रे असल्याचा गंभीर आरोप – काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांनी गुरूवारी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेसमध्ये सोनिया, राहुल, प्रियंका, नवे अध्यक्ष खरगे आणि वेणुगोपाल ही 5 वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. काँग्रेसमध्ये वैचारिक संघर्ष सुरू असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये घोर निराशा पसरली आहे, असे ते म्हणालेत. निरुपम म्हणाले की, राहुल गांधींच्या आसपास असणार्‍या डाव्यांचा श्रद्धेवर विश्‍वास नाही. एकट्या काँग्रेसने राम लल्लाच्या अभिषेकाच्या निमंत्रणाला उत्तर म्हणून पत्र लिहून हा भाजपचा प्रचार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले. तत्पूर्वी, संजय निरुपम यांनी गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे, आपण पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपली हकालपट्टी केल्याचा दावा केला.

COMMENTS