अहिल्यानगर जिल्ह्यातील उद्योजकांसाठी ८ जुलै रोजी निर्यात प्रोत्साहन कार्यशाळा

Homeताज्या बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील उद्योजकांसाठी ८ जुलै रोजी निर्यात प्रोत्साहन कार्यशाळा

अहिल्यानगर, दि. ३ – जिल्ह्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देत निर्यातीला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी ८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाज

सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस सोडण्याची मागणी
‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ !
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित – विनोद कळेकर

अहिल्यानगर, दि. ३ – जिल्ह्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देत निर्यातीला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी ८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता ॲटो इंजिनिअरिंग क्लस्टर, प्लॉट क्र. ४७/५, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे एक दिवसीय निर्यात प्रोत्साहन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्योजक, निर्यातदार, नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच निर्यात क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक दीपक शिवदास यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीच्या बैठकीत याकार्यशाळेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटनांना निर्यातीसंबंधी विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी, निर्यात धोरणे, आवश्यक कागदपत्रे, निर्यात प्रक्रिया, उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण या विषयांवर तज्ज्ञ आपला अनुभव सांगणार आहेत.

ही माहिती उद्योजकांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या व प्रक्रिया समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, स्टेशनरोड, शासकीय तांत्रिक विद्यालय आवार, एमएसईबी कार्यालयाच्या मागे, अहिल्यानगर येथे किंवा ०२४१-२३५५३४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS