Homeताज्या बातम्यादेश

फटाका कारखान्यात स्फोट, 11 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील घटना ; 100 हून अधिक जखमी

भोपाळ ः मध्यप्रदेशातील हरदा येथील अवैध फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक जखमी आहेत. त्यामुळे मृत्यूचा आक

मुंबईतील चारही धरणे पावसामुळे ओव्हर फ्लो
मेट्रोच्या सल्लागारावर 368 कोटींची खैरात
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये सामाजिक उपक्रम

भोपाळ ः मध्यप्रदेशातील हरदा येथील अवैध फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक जखमी आहेत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारखान्याच्या आजूबाजूला रस्त्यावर काही मृतदेह पडले आहेत. 25 हून अधिक जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने 100 हून अधिक घरे रिकामी केली आहेत. स्फोटामुळे वाहनांसह अनेक पादचारी दूर फेकले गेले. कारखान्यात अधूनमधून स्फोट होत असल्याचे सांगितले जात आहे. मगरधा रोडवरील बैरागढ गावात कारखाना आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात एवढा भीषण स्फोट झाला की संपूर्ण शहर हादरले. आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. कारखान्यातून उठणार्‍या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीचे कारण सध्या समजू शकलेले नाही. हरदा आणि आसपासच्या जिल्ह्यातून सुमारे 114 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. हरदा येथील फटाका कारखान्यात झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तातडीने दखल घेतली आहे. मुुख्यमंत्री डॉ. यादव यांनी भोपाळ, इंदूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि एम्स भोपाळमधील बर्न युनिटला जखमींवर उपचारासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उत्तम उपचार हे आमचे पहिले प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेऊन घटनेच्या स्थितीबाबत माहिती घेतली व आवश्यक निर्देश दिले. हरदा ते भोपाळ दरम्यान ग्रीन कॉरिडॉर बनवला जात आहे. फटाक्यांच्या कारखान्यातील जखमींना या कॉरिडॉरमधून भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटल आणि एम्स भोपाळमध्ये आणले जाईल. सीएमएचओ हरदा डॉ. एचपी सिंह यांनी सांगितले की, फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या 11 जणांना हरदा जिल्हा रुग्णालयातून भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात पाठवण्यात आले.

अवैध दारूगोळा बेतला जीवावर – कारखान्याच्या आजूबाजूच्या घरांमध्ये अवैधपणे दारूगोळा ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. हाच अवैध दारूगोळा अनेकांच्या जीवावर बेतण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक घरे पूर्णपणे उध्वस्त झाली. येथून जाणार्‍या अनेक पादचार्‍यांना याचा फटका बसला. रस्त्याच्या कडेला अनेक मृतदेह पडले आहेत.

COMMENTS