Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

मुंबई : काही दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही सरकाकडून कोणत्याही उपाययोजना हाती घेण्य

खाकी बदनाम! पोलिसाचाच विवाहितेवर बलात्कार | LOKNews24
ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
40 हजार पदांची जम्बो भरतीची घोषणा

मुंबई : काही दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही सरकाकडून कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या नाहीत. कारण काही दिवसांपूर्वीच स्फोट झाल्यानंतर पुन्हा रविवारी डोंबिवलीतील एमआयडीसी कंपनीत स्फोट झाल्यामुळे राज्य सरकारचा गलथानपणा समोर आला आहे.
डोंबिवली पुन्हा एकदा रविवारी हादरली. एमआयडीसी फेज-2 मधील एका कंपनीत मोठा स्फोट झाला. यानंतर तिथे भीषण आग लागली आहे. यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. डोंबिवलीतील एमआयडीसी असलेल्या न्यू अ‍ॅग्रो केमिकल या कंपनीला ही आग लागली आहे. या कंपनीत कापड प्रिटींगसाठी लागणारे केमिकल बनवण्याचे काम केले जाते. रविवारी 7 जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. त्यानंतर काही मिनिटातच ही आग सर्वत्र पसरली. प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रिक पार्किंगमुळे भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी 6 कामगार काम करत होते. सुदैवाने ते सुखरुप बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान याआधीही डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर काही लोक अजूनही बेपत्ता असल्याची महिती समोर आली होते. या घटनेत जखमी झालेल्यांची संख्याही जास्त होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात 304 ए कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतरही आगीच्या दुर्घटना थांबण्याचे नाव समोर येत नाही.

COMMENTS