Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’पिपाणी’ निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा

खा. शरद पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई ः लोकसभा निवडणुकीत खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने चांगलीच कामगिरी बजावली असली तरी अनेकठिकाणी पिपाणी चिन्ह दिल्यामुळे शरद पवार गटाच्या

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भेगा थातुरमातुर बुजवणे नव्हे तर ब्लॉक कट करुन दुरुस्ती सुरू-डॉ.गणेश ढवळे
विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून 170 कोटी दंड वसूल
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड l

मुंबई ः लोकसभा निवडणुकीत खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने चांगलीच कामगिरी बजावली असली तरी अनेकठिकाणी पिपाणी चिन्ह दिल्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. याची दखल घेवून शरद पवार यांनी पिपाणी चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी सोमवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच शरद पवार गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचाही इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ’तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लोकसभेच्या 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर त्यांचा विजय झाला. सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांचा थोडक्यात पराभव झाला. या ठिकाणी तुतारीशी साधर्म्य असणार्‍या पिपाणीवर निवडणूक लढवणार्‍या अपक्ष उमेदवाराला बरीच मते मिळाली. इतरही मतदारसंघांत शरद पवार गटाला पिपाणीचा फटका बसला. या पार्श्‍वभूमीवर पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पिपाणी निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीत मोठे नुकसान झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने यासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा शरद पवार गटाने आपल्या पत्राद्वारे दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 45 हजार मतांनी पराभव झाला होता. पण याच मतदारसंघात पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणार्‍या अपक्ष उमेदवाराला तब्बल 37 हजार मते मिळाली होती. यावर राष्ट्रवादीचा आक्षेप आहे.

COMMENTS