Homeताज्या बातम्याशहरं

कराड-विटा मार्गावर दुचाकीच्या स्फोटाने खळबळ

कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावरती सोमवार, दि. 18 रोजी पहाटे बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीन कांड्यांनी उडविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होत

’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?
उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज सुरूवात
मेकॅनिकल स्वपिंग मशीनमुळे पाचगणीतील रस्ते होणार चकाचक; स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत : पाच मेकॅनिकल मशीन पालिकेत उपलब्ध

कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावरती सोमवार, दि. 18 रोजी पहाटे बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीन कांड्यांनी उडविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. यावेळी पोलिसांनी सतर्कता बाळगत चोरीचा कट उधळला होता. तसेच एकाला अटक केली होती, मात्र अन्य 3 जण दुचाकी घेऊन फरार झाले होते. या गुन्ह्यातील दुसरी दुचाकी जिलेटीनसह आज सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी एटीएमनंतर दुचाकीचा स्फोट घडवून आणला.
याबाबतची अधिक माहिती अशी, कराड येथे गजानन हाऊसिंग सोसायटीत असलेल्या बँक ऑफ इंडियाची गोवारे गावची शाखा आहे. याठिकाणी सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली होती. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा चोरट्यांनी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून दुचाकी घेऊन पलायन केले होते. तर एक दुचाकी आणि एक चोरटा पकडण्यात यश आले होते.
दरोड्यातील चार संशयितांपैकी तीन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. यामधील दुसरी दुचाकी जिलेटीन कांड्यासह आज पोलिसांना सापडली. दरोड्यातील संशयितांचा अद्याप शोध सुरू असून गाडीचा शोध कराड पोलिसांना 3 दिवसांनी लावला आहे. बॉम्ब स्कॉडच्या श्‍वान पथकातील श्‍वानांनी गाडीमध्ये स्फोटक वस्तू असल्याचे संकेत दिले होते.
जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या असल्याने त्या कांड्या बाहेर काढणे धोकादायक झाले होते. त्यामुळे त्या जागेवर नष्ट करण्यात आल्या. करवडी (ता. कराड) गावच्या हद्दीत माळरानावर दुचाकी केली नष्ट करण्यात आली. यावेळी मोठ स्फोटासह आवाजही झाला. जिलेटीनचा ब्लास्ट झाल्याने दुचाकी गाडीने जागेवर पेट घेतला. पोलिसांनी गाडी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS