Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडूंचा सरस कामगिरी

राष्ट्रीय स्पर्धेत अहमदनगर खेळाडूंची पाच पदकांची कमाई

अहमदनगर ः राजस्थानमधील सवाई माधवराव स्टेडियम जयपूर येथे 6 ते9 फेबु्रवारीदरम्यान झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा इंडिया तायक्वांदो आयोजित, व

श्रीगोंदा तालुक्याला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध ः मंत्री विखे
कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरांना ठोकल्या बेडया
मुंबईमध्ये येत्या 2 डिसेंबरला होणार बारा बलुतेदार महासंघाचे अधिवेशन

अहमदनगर ः राजस्थानमधील सवाई माधवराव स्टेडियम जयपूर येथे 6 ते9 फेबु्रवारीदरम्यान झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा इंडिया तायक्वांदो आयोजित, वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशनच्या मान्यतेने संपन्न झाल्या असून, या स्पर्धेत अहमदनगर येथील एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडूंनी पुन्हा एकदा सरस कामगिरी करत पाच पदकांची कमाई केली.
यामध्ये रौप्यपदक वनश्री लष्करे, कांस्यपदक श्रीनिवास शिंदे, थाणोजसाईरेड्डी किसरा, विराज पिसाळ, पूमसे ज्यूनिअरमध्ये कांस्यपदक रुद्र आहेर यांनी पदकांची कमाई केली. तर यासोबतच सहभागी खेळाडू सोहम काळे, आर्यन आंग्रे या सर्व राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडूंचे एकलव्य तायक्वांदो अकॅडमी व स्पोर्टस तायक्वांदो असोसिएशन अहमदनगर यांच्यावतीने खूप खूप अभिनंदन सर्व खेळाडूंचा इंडिया तायक्वांदो चे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेवजी शिरगावकर सर यांनी अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अल्ताफ खान, गणेश वंजारे, योगेश बिचीतकर, सचिन मरकड, मंगेश आहेर, तेजस ढोबळे, सचिन कोतकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंना आमदार संग्राम भैय्या जगताप व तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष माणिकराव विधाते, उपाध्यक्ष संतोष लांडे, सचिव घनश्याम सानप, एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीपदादा सातपुते, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओम्बासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सी. ई ओ. गफार पठाण टेक्निकल डायरेक्टर तुषार आवटे, यांनी भावी वाटचालीसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. व पुढील येणार्‍या स्पर्धेत नक्कीच अहमदनगर जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळतील व अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र राज्याचे तसेच आपल्या आई-वडिलांचे व प्रशिक्षकांचे नाव उंचावतील अशा सर्व मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS