Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारीत सर्व रोग निदान शिबिरात 170 रुग्णांची तपासणी

oplus_2 कोपरगाव : एखादी व्यक्ती सामाजिक कार्यात समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंत गोरगरिबांची सेवा करत असते. दुर्दैवाने नियतीच्या फेर्‍यात त

संत ज्ञानेश्‍वर शाळेच्या100 टक्के निकालाची परंपरा कायम
राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप
राष्ट्रीय जल अकादमीत’पाणी’ विशेषांकाचे प्रकाशन
oplus_2

कोपरगाव : एखादी व्यक्ती सामाजिक कार्यात समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंत गोरगरिबांची सेवा करत असते. दुर्दैवाने नियतीच्या फेर्‍यात ती व्यक्ती कायमची आपल्यातून निघून जाते. अशावेळी त्या व्यक्तीचे समाजाप्रती असलेले दातृत्वरुपी सामाजिक कार्य त्या व्यक्तीनंतरही पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही समाजाची असते. याच भावनेतून माझा दिवंगत सहकारी राहुल टेके यांचे कार्य राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुढे सुरू आहे. याचे निश्‍चित समाधान आहे. असे भावनिक उद्गार गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी काढले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ वारी येथे राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, एस.जे.एस. हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विशेष सहकार्याने सर्व रोग निदान शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी 170 रुग्णांणी स्वतःची तपासणी करून लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे होते. कार्यक्रमाची सुरुवात राहुल टेके यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी कोपरगाव पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी आरोग्य विभाग विषयी मार्गदर्शन करीत राहुल टेके यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकरराव टेके, उपसरपंच विजय गायकवाड, रामदास सोनवणे, दौलत वाईकर, विशाल गोर्डे, प्रकाश गोर्डे, डॉ. सायली ठोंमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर एलआयसीचे विस्तार अधिकारी प्रशांत वाबळे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके, उपसरपंच विजय गायकवाड, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे, कामगार नेते रामदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा टेके, सुवर्णा गजभिव, प्रणाली देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अशोक निळे, विशाल गोर्डे, योगेश झाल्टे, वाल्मीक जाधव, विजयसिंह गायकवाड, प्रसाद साबळे, दौलत वाईकर, भगवान पठाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, गोरख टेके, डॉ. हिमांशू त्रिवेदी, एस. जे. एस. हॉस्पिटलचे डॉ. सायली ठोंमरे, डॉ. श्रीनिवास उगले, डॉ. अनिरुद्ध उबाळे, डॉ. मेहरबान सिंग, डॉ. सोनाली काळे, जनसंपर्क अधिकारी महेश रक्ताटे, सहाय्यक अधिकारी रविराज बिडवे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत खोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलाक्षी पिसे, कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष संजय टेके, नरेंद्र ललवाणी, राजू ठाकूर, विजय ठाणगे, राजेंद्र मुरार, गणेश भाटी, मच्छिंद्र मुरार, अशोक गजभिव, अशोक बोर्डे, बबलू जावळे, मयूर निळे, गोरख विंचू, रविंद्र टेके, विशाल टेके, भीमराव आहेर, मदन काबरा, सोनू गुंजाळ, सपना रोकडे, गीतांजली ठाकरे, रोहिणी ठाकरे, मोहिनी देशमुख,अश्‍विनी झाल्टे यांच्यासह ट्रस्टचे स्वयंसेवक, राहुल टेके यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार तसेच तपासणीसाठी आलेले सर्व रुग्ण उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी राहुल दादा मित्र मंडळाच्या सर्व तरुण सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी माने यांनी तर प्रास्ताविक रोहित टेके यांनी केले. तसेच गोरख पिके यांनी आभार मानले.

COMMENTS