Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी होणार 10 डिसेंबर रोजी परीक्षा

नाशिक- जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल या रिक्त पदभरतीसाठी 22 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणारी परीक्षा शासन निर्देशानुसार स्थगित करण्यात आली

अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत दिसणार (Video)
LOK News 24 I अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे बलात्कार
नगरमध्ये लैंगिक शोषणाचे सहा भयानक प्रकार… ; प्रदेश भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा

नाशिक- जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल या रिक्त पदभरतीसाठी 22 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणारी परीक्षा शासन निर्देशानुसार स्थगित करण्यात आली होती. परंतू जिल्ह्यातील पेसा कार्यक्षेत्राबाहेरील पदभरतीसाठी निर्बंध नसल्याने पोलीस पाटील व कोतवाल पदांची 10 डिसेंबर 2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस पाटील पदासाठी निफाड उपविभागातील निफाड व सिन्नर, येवला उपविभागातील येवला व नांदगांव, मालेगाव उपविभागातील मालेगाव तालुक्यात तसेच कोतवाल पदासाठी येवला, नांदगांव, मालेगाव, निफाड, सिन्नर व चांदवड या तालुक्यातील अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 डिसेंबर 2023 पासून https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देवून परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यावीत. तसेच त्याबाबत काही अडचण असल्यास संबंधित तहसिल कार्यालयस्तरावर असलेल्या मदत कक्षाकडे (Help Desk) जावून परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यावीत, असेही अपर जिल्हाधिकारी श्री पारधे यांनी कळविले आहे.

COMMENTS