पाथर्डी ः मढी येथील कानिफनाथांची यात्रा ही राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर ही प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक यात्रा काळात येतात यात्
पाथर्डी ः मढी येथील कानिफनाथांची यात्रा ही राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर ही प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक यात्रा काळात येतात यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी गाव करील ते राव करील काय या म्हणी प्रमाणे ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाच्या बरोबरीने आपली जबाबदारी उचलून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले. ते मढी यात्रा पार्शवभूमीवर गुरुवारी मढी देवस्थानच्या सभागृहात आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीसाठी तहसीलदार अश्विन नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे, नारायणबाबा जाधव, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाठ, बबनराव मरकड, सचिन गवारे, भाऊसाहेब मरकड, रवींद्र आरोळे, डॉ. रमाकांत मरकड, डॉ. विलास मढीकर यांच्यासह शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बैठकीत चर्चा करताना अनेकांनी तिसगाव ते मढी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून ते बुजवून त्या रोडच्या साईडपट्टा भरून घ्याव्यात,फिरते शौचालय उभारावे,पार्किंग साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. तर संजय मरकड यांनी चालू वर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने वांबोरी चारीचे पाणी सोडल्यास ते मढी च्या तलावात येऊन पाणी टंचाई जाणवणार नाही तसेच या काळात लोडशेडिंग करण्यात येउ नये अशी मागणी. या वेळी यात्रेचा पूर्ण आढावा घेताना मते म्हणाले कि चालू वर्षी कधीही निवडणूका घोषित होऊ शकत असल्याने पोलीस बंदोबस्त पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नसून या वर्षी मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याने येणार्या भाविकांना त्रास होणार नाही यासाठी देवस्थानने स्वयंसेवक बंदोबस्तासाठी बोलवावे व त्यांना भाविकांशी कशा पद्धतीने वर्तन करावे या साठी समुपदेशन करावे.फिरते शौचालय मिळण्यासाठी देवस्थानने नगर महापालिकेशी संपर्क करावा.चालू वर्षी पाण्याची समस्या भेडसावत असली तरीही यातून आपण मार्ग काढून भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ.बांधकाम विभागाने मढी मंदिराकडे येणार्या मार्गावरील सर्व खड्डे बुजवून तातडीने साईटपट्ट्या ची कामे करावी.यात्रेत येणार्या भाविकांना रहदारी साठी रस्त्याकडील दुकानांना रस्त्यापासून दोन्ही बाजुंनी 5 फटाचे अंतर सोडून जागा द्यावी त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही.
COMMENTS