Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डेंग्यूवर पायबंद घालण्यासाठी दर रविवार कोरडा दिवस पाळावा

लातूर प्रतिनिधी - दर रविवारी आपण आपल्या घराच्या छातावर, तसेच अंगणात अडगळीचे बिनकामी, निरुपयोगी साहित्य, टायर्स, बाटल्या पडलेल्या आहेत का, हे तपा

…तर, विधानसभेच्या 288 जागा लढवणार : मनोज जरांगे
पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा
मोदींनी प्रस्ताव नसताना गुजरातला मदत ; अजित पवार यांची टीका

लातूर प्रतिनिधी – दर रविवारी आपण आपल्या घराच्या छातावर, तसेच अंगणात अडगळीचे बिनकामी, निरुपयोगी साहित्य, टायर्स, बाटल्या पडलेल्या आहेत का, हे तपासून त्याची विल्हेवाट लावावी. त्यात पावसाचे थोडेजरी पाणी साचलेले असेल तर ते जमिनीवर फेकून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे. सद्यस्थितीत पावसाळा असल्याने छतावरील, अंगणातील साहित्यात पावसाचे पाणी साचून एडिस इजिप्ती डासाची पैदास होऊन घरातील व्यक्तीना डेंगूचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनतेने डेंग्यू होऊ नये, यासाठी दर रविवारी कोरडा दिवस पाळावा व त्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीव्र ताप, अंगदुखी, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्याच्या मागे दुखणे, रक्तस्त्रावीत डेंग्यु तापामध्ये शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकिय उपचार घ्यावा. डेंग्यू या रोगांचा प्रसार डासांमार्फत होतो. रोग दूषित व्यक्तीस डास चावल्यानंतर तो डास निरोगी व्यक्तीस चावल्यास या रोगांचा प्रसार होतो. डेंग्यू ताप या रोगाचा प्रसार ‘एडीस एजिप्ती’ या डासामार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या व साठलेल्या स्वच्छ पाणी साठे जसे हौद, सिमेंटची पाण्याची टाकी, रांजण, माठ, टायर्स, भंगार सामान, छतावरील साठलेले पाणी, कुलर, बाटली, बादल्या नारळांच्या करवंट्या नळाचे खड्डे या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठून राहिल्यास होते. घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातून किमान एक वेळेस पाणीसाठे रिकामे करुन पुसून घेवून कोरडी करुन नंतरच पाणी भरावे. टायर्स व निरुपयोगी, भंगार सामान घराबाहेर, छतावर ठेवू नये त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहून डासोत्पत्ती होते. या साहित्याची विल्हेवाट लावावी. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तिक संरक्षणासाठी डासांना पळवून लावणाच्या कॉईल, ओडोमास साधनांचा वापर करावा. नाली, गटारे वाहती ठेवावीत जास्त काळ पाणी साठून राहत असल्यास त्यामध्ये जळालेले तेल, वंगण, केरोसीन टाकावे. तापाचा रुग्ण आढळून आल्यास त्यास तात्काळ दवाखान्यात नेवून आवश्यक तो उपचार घ्यावा. याप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

COMMENTS