आईच्या आठवणीत होता प्रत्येक क्षण…; रुणाल जरेने व्यक्त केली भावना ; न्याय मिळवून देण्याचा निर्धारही व्यक्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईच्या आठवणीत होता प्रत्येक क्षण…; रुणाल जरेने व्यक्त केली भावना ; न्याय मिळवून देण्याचा निर्धारही व्यक्त

अहमदनगर/प्रतिनिधी : कोणाला शिक्षणासाठी वा कोणाला औषध-उपचारांसाठी काहीही मदत लागली तर आई त्यासाठी आधाराचा हात द्यायची…त्यामुळे आज अशा मदतीसाठी कोणी मा

जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या पत्नीने धमकावले…;संबंधितांवर कारवाई करण्याची रुणाल जरेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन बोठेने दिली जरे हत्येची सुपारी? : रुणाल जरेचा दावा
रुणाल जरे याच्या अंगरक्षकाला दमबाजी l Rekha Jare Hatyakand l Bal Bothe I LOK News 24

अहमदनगर/प्रतिनिधी : कोणाला शिक्षणासाठी वा कोणाला औषध-उपचारांसाठी काहीही मदत लागली तर आई त्यासाठी आधाराचा हात द्यायची…त्यामुळे आज अशा मदतीसाठी कोणी माझ्याकडे आले तर मला आईची लगेच आठवण होते…अर्थात मागील पूर्ण वर्ष तिच्या आठवणीशिवाय एक क्षणही गेला नाही…अशी भावना यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्ष (स्व.) रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने व्यक्त केली.
रेखा जरे यांची मागील वर्षी 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात (ता. पारनेर) दोघाजणांनी चाकूचा गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केली आहे. मराठा क्रांती मोर्चासह नगरच्या सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक काम करणार्‍या रेखा जरे यांच्या हत्येने नगर शहर व जिल्हाच नव्हे तर राज्य व देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आधी पाचजणांना पकडले, पण मुख्य सूत्रधार नगरचा पत्रकार बाळ ज. बोठे असल्याचे स्पष्ट झाल्यावर व तो फरार झाल्यावर पोलिसांकडून त्याचा सुरू असलेला शोध नेहमीच चर्चेत व संशयाच्या भोवर्‍यात राहिला. त्याला पकडणे पोलिसांना आव्हानात्मक झाले होते. पण पोलिसांनी कसून शोध घेऊन त्याला तब्बल 102 दिवसांनी हैदराबादला जेरबंद केले आणि पोलिसांच्या या खून प्रकरणाच्या तपासावरील संशयाचे सावटही दूर झाले. साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळाचे पुरावे व काही तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आधी पाच आरोपींविरुद्ध व नंतर बोठेसह राहिलेल्या सहाजणांविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या पार्श्‍वभूमीवर आता लवकरच या खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणे अपेक्षित आहे.

रुणालने दिला आठवणींना उजाळा…
रेखा जरे यांच्या हत्येला एक वर्ष होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा मुलगा रुणाल याच्याशी संपर्क साधल्यावर आईच्या आठवणी सांगताना त्याला गहिवरून आले. आईची आठवण आली नाही, असा एकही क्षण मागील वर्षभरात गेला नाही, आमचे सारे कुटुंब अजून तिच्या आमच्यात नसण्याच्या शॉकमध्ये आहोत. ते वास्तव स्वीकारणे अजूनही जड जात आहे. त्यामुळे गरीबांना व गरजवंतांना मदत करण्याची तिची परंपरा मागील वर्षभरात मीही सुरू ठेवली आहे. पण अशी कोणाला मदत करताना हमखास तिची आठवण येते, असे सांगून रुणाल म्हणाला, घरात वा बाहेरही तिची आठवण येत नाही वा तिच्या सेवाभावी कार्याची चर्चा होत नाही, असे घडलेच नाही. कोणीही भेटले तरी तिच्या सामाजिक कामांच्या आठवणींचा विषय निघतो. तिने समाजसेवेतून स्वतःचे स्वतंत्र विश्‍व व अस्तित्व निर्माण केले होते व तिचा मुलगा म्हणून मला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे तिच्या खुन्यांना शिक्षा मिळणे व तिला न्याय मिळवून देण्याचे ध्येय आता माझे आहे, असेही त्याने आवर्जून सांगितले.
मागील पूर्ण वर्ष आमच्या जरे कुटुंबासाठी भयानक होते. आईच्या खुनाच्या घटनेने मोठा आघात झाला होता. पण आता हळूहळू मी, धाकटा भाऊ, आजी, पत्नी, वडील आम्ही सारे सावरत आहोत, असे सांगून रुणाल म्हणाला, नातेवाईक व मित्रपरिवाराने आम्हाला धीर दिला व खूप आधारही दिला आहे. खून खटल्याच्या अनुषंगाने अनेक घटनाही घडल्या. दबावही आले. पण आईला न्याय मिळवून देण्याचे माझे ध्येय कायम आहे, असेही रुणालने आवर्जून सांगितले. आईचे वर्षश्राद्ध नुकतेच तिथीनुसार घरी केले आहे. त्यामुळे 30 रोजी घरीच छोटेखानी श्रद्धांजली कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे, असे सांगताना मागील वर्षभरात घडलेल्या अनेक घडामोडींना त्याने उजाळा दिला. एकीकडून दबाव होते, पण दुसरीकडून आधार असल्याने सावरता आले. कुटुंबाला सावरणे व दुसरीकडे खून प्रकरणातील तपासावर लक्ष ठेवण्याचेही आव्हान होते. पण आईने सामाजिक कामातून मिळवलेल्या लौकिकाने अनेकांनी मदत केली व आधारही दिला, असेही रुणालने आवर्जून सांगितले. दबावाचे व दमबाजीचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वीच अशी एक घटना घडली आहे. त्याबाबत आता पोलिसांना नव्याने अर्ज देणार असून, त्या प्रकरणातील आरोपींना पकडण्याची मागणी करणार आहे, असेही त्याने सांगितले.

COMMENTS