औंध / वार्ताहर : औंध गावाला व गटाला एक वेगळा ऐतहासिक, धार्मिक व सुसंस्कृतपणाचा वारसा आहे. तो जपण्यासाठी आपण तयारीला लागा, माझ्या औंध गटाविरुध्द

औंध / वार्ताहर : औंध गावाला व गटाला एक वेगळा ऐतहासिक, धार्मिक व सुसंस्कृतपणाचा वारसा आहे. तो जपण्यासाठी आपण तयारीला लागा, माझ्या औंध गटाविरुध्द कोणी कितीही षडयंत्रे रचली तरी त्यांना मी पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिला.
औंध जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होते. यावेळी एस. पी. देशमुख, सुनंदा राऊत, संदीप मांडवे, मनोज देशमुख, पृथ्वीराज गोडसे, प्रा. रामचंद्र साळुंखे, जयवंत खराडे, योगेश फडतरे, हणमंत शिंदे, राजेंद्र माने,
अमर देशमुख, रमेश देशमुख, राजेंद्र देशमुख, मंगेश फडतरे, सुनील फडतरे, सागर सावंत, सोमनाथ साठे, विष्णुपंत शिंदे, गणेश देशमुख, दीपक नलवडे, प्रदीप गोडसे, शुभम शिंदे, इलियाज पटवेकरी, सुखदेव इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी म्हणाल्या, औंध ही विरांची आणि शुरांची भूमी आहे. इथे कोण विरोधात उभे राहणार आहे याची मला अजिबात फिकीर नाही. येथील जनता स्वाभिमानी असून बाह्यशक्तींचा विचारही करु शकणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी बाकी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आपल्या औंधचा वारसा जपण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी औंध गटातील सर्व गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS