मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडची 'खल्लास गर्ल' अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर सध्या चर्चेत आली आहे. ईशा कोपीकरच्या चाहत्यांसाठी ही खूपच धक्कादायक बा

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर सध्या चर्चेत आली आहे. ईशा कोपीकरच्या चाहत्यांसाठी ही खूपच धक्कादायक बातमी आहे. ईशाचे १४ वर्षांचं नातं तुटलं आहे. ईशाने तिचा पती टिमी नारंगसोबत घटस्फोट घेतला आहे. ईशा आणि टिमीला ९ वर्षांची मुलगी आहे. आई-बाबा वेगळे झाल्यामुळे ईशा कोपीकरची मुलगी रियाना खूपच दुखावली आहे. ईशाच्या घटस्फोटाच्या बातम्या जरी समोर येत असल्या तरी देखील याबाबत अभिनेत्रीने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. लग्नाच्या १४ वर्षानंतर ईशा आणि टिमी वेगळे झाले आहेत. या कपलला ८ वर्षांची मुलगी रियाना आहे. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, लग्नाच्या 14 वर्षानंतर ईशा आणि टिमी यांनी वेगळं होतं घटस्फोट घेतला आहे. ईशा आणि टिमीचा नोव्हेंबर २०२३ मध्येच घटस्फोट झाला होता. यानंतर अभिनेत्रीने तिच्या 9 वर्षांच्या मुलीसोबत टिमीचे घर सोडले. घटस्फोटानंतर ईशाने तिची मुलगी रियानाची जबाबदारी घेतली असल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, ईशा आणि टिमीने सुसंगततेच्या मुद्द्यावरून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ईशाने घर सोडले असून ती आपल्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. ईशा आणि टिमी या कपलकडे आदर्श आणि पॉवर कपल म्हणून पाहिले जात होते. घटस्फोटाच्या निर्णयामुळे ईशाच्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. या दोघांनी आपलं लग्न टिकावं यासाठी खूप प्रयत्न केला. पण ते होऊ शकले नाही. शेवटी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
COMMENTS