Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात समता व्याख्यानमालेचे आयोजन

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती महोत्सव समिती व फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या संयुक्त विद्य

ज्यांनी जीवन घडविले तेच माझ्या लेखनाचे आदर्श : डॉ. बाबुराव उपाध्ये
अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक
श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती महोत्सव समिती व फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी समता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही व्याख्यानमाला 11 ते 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे समन्वयक रवी सातपुते यांनी दिली.
या व्याख्यानमालेची सुरुवात 11 एप्रिलला होणार आहे. पहिल्या दिवशी ‘महात्मा फुले: सामाजिक क्रांतीचे प्रणेते’ या विषयावर प्रा. डॉ. जगदीश सोनवणे यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी डॉ. भास्कर रणनवरे असतील. याच दिवशी मोफत अरणगाव येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 12 एप्रिल रोजी ‘भारतीय राज्यघटनेपुढील आव्हाने’ या विषयावर डॉ. श्रीरंजन आवटे यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्रा. अर्जुन कांबळे असतील. 13 एप्रिल रोजी ‘धम्म आणि सद्यस्थिती’ या विषयावर एम. डी. चंदनशिवे यांचे मार्गदर्शन होईल. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. विद्या जाधव असतील. ही तिन्ही व्याख्याने खंडेलवाल सांस्कृतिक भवन, जॉगिंगपार्क जवळ सावेडी येथे होतील. तर 14 एप्रिल रोजी ‘सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी शिरीष जाधव असतील. हे व्याख्यान व कार्यक्रम आम्रपाली गार्डन गुलमोहोर रोड सावेडी येथे होईल. तर 15 एप्रिल रोजी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या विषयावर संजय नगरकर यांचे ऑनलाइन व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्रा. राजरत्न खिल्लारे असतील. सर्व व्याख्याने संध्याकाळी 6 वाजता सुरू होतील. 14 एप्रिल रोजी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण होईल. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्‍नमंजूषा इत्यादि कार्यक्रमाबरोबरच समाजातील विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचे सन्मान करण्यात येणार आहेत. या व्याख्यानमालेचा सर्व समाजबांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

COMMENTS