माले ः इस्रायल-गाझा युद्धात मालदीवच्या मुइज्जू सरकारने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. सरकारने देशातील पासपोर्ट नियमांमध्ये बदल करून इस्रायली पास
माले ः इस्रायल-गाझा युद्धात मालदीवच्या मुइज्जू सरकारने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. सरकारने देशातील पासपोर्ट नियमांमध्ये बदल करून इस्रायली पासपोर्टवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर इस्रायली नागरिकांना मालदीवमध्ये प्रवेश करता येणार नाही. मालदीवचे गृहमंत्री अली इहुसान यांनी सांगितले की, इस्रायली पासपोर्ट असलेल्या लोकांना मालदीवमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी मंत्रिमंडळाने विशेष समितीही स्थापन केली आहे. या समितीमध्ये देशातील वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांचा समावेश आहे.
COMMENTS