Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 छत्रपती संभाजी नगरच्या उद्योजकांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

शहराची शांतता भंग होऊ नये यासाठी आवाहन

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर नामांतरणावरून सध्या शहरांमध्ये शांतता भंग होण्याची चिन्ह उद्योजकांना दिसले आहे त्यामुळे उद

छत्रपती संभाजीनगरात विनापरवानगी कँडल मार्च
शेतीच्या वादातून शेतकर्‍याची निर्घुण हत्या.
‘ईडी’ने कन्नड साखर कारखाना केला जप्त

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर नामांतरणावरून सध्या शहरांमध्ये शांतता भंग होण्याची चिन्ह उद्योजकांना दिसले आहे त्यामुळे उद्योजकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या शहराची शांतता भंग होऊ नये. नामांतराच्या बाजूने आहोत की विरोधात आहोत हा मु्द्दा नाही. आम्ही शहराच्या बाजूने आहोत. नाव कोणतेही असो या ठिकाणी जी ट्वेंटी निमित्त परिषद झाली आहे. त्यातून एक संदेश जगामध्ये चांगला गेला आहे. तो पुसला जाऊ नये, कोरोनानंतर उद्योग नगरी आता कुठे रुळावर येत असताना मध्येच जर अशा काही गोष्टी घडल्या तर यातून शहराची प्रतिमा मलिन होऊ शकते. याकरिता शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे उद्योजकांनी सांगितले.

COMMENTS