Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विंचूर विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

नाशिक - विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये नवीन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला

‘मोरया जॉगर्स’च्या वतीने आयर्नमॅन विलास सानप यांचा सत्कार
  संशोधन क्षेत्रातील वाड;मयचौर्य नव संशोधकांसाठी धोक्याचे- प्राचार्य डॉ. अर्चना आदिक पवार
अभिनेत्री शर्लिनला जीवे मारण्याची धमकी

नाशिक – विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये नवीन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयात उपस्थित मान्यवरांचे व नवीन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागतगीत, पुष्पवृष्टीद्वारे, व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुस्तकाचे वाटप करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षक वृंद यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोमनाथ निकम, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ प्रविण सानप, बाळासाहेब सानप, विलास हुजबंद, सोमनाथ रसाळ, साहेबराव साळवे, पालक विद्यालयाचे  पर्यवेक्षक के.जी.जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाइफ मेंबर आर.के चांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी.टी. जोरे यांनी केले. 

COMMENTS