Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आव्हाड महाविद्यालयात इंग्रजी निबंध स्पर्धा उत्साहात

पाथर्डी ः येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आजच्या तरुणाईच्या स्वप्नातील भारत क

पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालयाकडून सत्कार
पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालया कडून सत्कार
आविष्कार स्पर्धेत आव्हाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

पाथर्डी ः येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आजच्या तरुणाईच्या स्वप्नातील भारत कसा असावा हे जाणून घेण्यासाठी येथील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय मध्ये इंडिया ऑफ माय ड्रीम या विषयावर इंग्रजीमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
भारताची आदर्श देशाची निर्मिती होत असताना देशातील गरिबी, बेरोजगारी, महागाई, दहशतवाद, जातीय तणाव या सारख्या समस्यांचे मूळ शोधून त्या दूर करण्यासाठी आपण उपाय योजना केल्या पाहिजे. मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. भ्रष्टाचार मुक्त, न्यायपूर्ण, सर्व समावेशक भारताची निर्मिती झाली पाहिजे तसेच उदारमतवादी धोरण लोकशाही मूल्ये आणि स्वतःची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेद्वारे केले. या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.लाटणे वैष्णवी द्वितीय क्रमांक महेश साळुंके तर तृतीय क्रमांक शिवणकर सानिका यांनी मिळवला. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ऍड. सुरेश राव आव्हाड, प्राचार्य डॉ.बी.ए चौरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. या निबंध स्पर्धेचे आयोजन प्रा.मन्सूर शेख यांनी केले.या इंग्लिश निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

COMMENTS