अकोले/प्रतिनिधी ः अकोले तालुक्याचे भूमिपुत्र तथा जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी कोतुळ पुलाची, पिंपरकणे पुलाची व अकोले तालु
अकोले/प्रतिनिधी ः अकोले तालुक्याचे भूमिपुत्र तथा जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी कोतुळ पुलाची, पिंपरकणे पुलाची व अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या चालू असलेल्या कालव्यांच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचा तालुक्याच्या व अगस्ती सह.साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अभियंता शेटे यांचेशी कालव्यांची अपूर्ण कामाबाबत चर्चा केली. सदरील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. त्यासाठी लेखी निवेदनही देण्यात आले.याप्रसंगी अगस्ती सह. साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पा.गायकर, जेष्ठ संचालक मीनानाथ पांडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर,कार्यकारी संचालक, सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, डाव्या बाजूच्या कालव्याचे काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे, परंतु त्यावरील पुलांचे भराव्याचे कामे अपूर्ण आहे. तसेच चाचणीच्या वेळी बर्याच ठिकाणी कालव्याला पाण्याची गळती लागलेली होती. सदरील ठिकाणी अस्तरीकरण करण्यात यावे. व पुलाच्या भराव्याचे काम पूर्ण करुन रहदारीला अडथळा होणार नाही अशी कामे करावीत.डाव्या बाजूचे उच्चस्तरीय योजनेचे पाणी चालू आहे. उजव्या बाजूच्या मुख्य कालव्याचे व उच्च स्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडावे.मुख्य कालव्यांना वितरिका करण्यासाठी गेट ठेवणे आवश्यक आहे.वरील सर्व प्रश्नांची चर्चा करुन शेटे यांना निवेदन देण्यात आले.
COMMENTS