Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथे अजित(दादा)पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली

व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त!केज । प्रतिनिधीकेज येथील छत्रपती शिवाजी चौक येथे अजित(दादा)पवार यांना सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर

मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार
देशाला मोदींशिवाय पर्याय नाही
अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा यांचे आवाहन

व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त!
केज । प्रतिनिधी
केज येथील छत्रपती शिवाजी चौक येथे अजित(दादा)पवार यांना सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तर केज येथील व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित (दादा) पवार यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच केज  तालुका सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केज बंदचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला. बुधवार रोजीची सकाळ ही महाराष्ट्रासाठी दुःखाचा दिवसच ठरली, राज्याचे मुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचा बारामती जवळ विमान दुर्घटनेत  मृत्यू झाल्याची बातमी कळताच केज तालुका सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केज बंदचे आव्हान केले असता व्यापार्‍यांनी लागलीच आपापली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात केजची संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. व्यापारी वर्गाने दिवसभरासाठी बाजारपेठ बंद ठेवत केज मधील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी आपापले दुकाने बंद ठेवून सर्वपक्षीय आणि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS